अफगाणिस्तानच्या आशा जिंवत, इंग्लंडच्या मोठ्या विजयाने उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा?
अफगाणिस्तान क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत मोठ्या संघांना पराभूत करून अस्वस्थता निर्माण करत आहे. यावेळीही अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. ज्यात त्यांनी इंग्लंडला हरवून एक धक्कादायक कामगिरी केली. अफगाणिस्तान संघाला अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पाऊस हा सर्वात मोठा खलनायक ठरला. ओल्या आउटफिल्डमुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे, ऑस्ट्रेलियाने ग्रुप बी मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अजूनही स्पर्धा आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले आहेत. एका विजयासह त्यांचे तीन गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट प्लस 2.140 आहे. हेच त्याच्या बाजूने आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाने त्यांचे तिन्ही सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एक जिंकला, एक हरला आणि एक सामना रद्द झाला. तीन गुणांसह त्याचा नेट रन रेट उणे 0.990 आहे.
दक्षिण आफ्रिकेला आज 1 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. सर्वप्रथम, अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध सामना हरवावा अशी प्रार्थना करावी लागेल. मग तीन सामन्यांनंतर आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी समान गुण असतील. अश्या परिस्थितीत निर्णय नेट रन रेटवर येईल. अफगाणिस्तानचा नेट रन रेट आफ्रिकेपेक्षा कसा वर जाऊ शकतो ते पाहुया.
जर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली तर त्यांना आफ्रिकन संघाला किमान 207 धावांनी पराभूत करावे लागेल. जर इंग्लंडने प्रथम गोलंदाजी केली तर त्यांना 11.1 षटकांच्या आत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. जर असे झाले तर अफगाणिस्तानचा नेट रन रेट आफ्रिकेपेक्षा जास्त असेल आणि तो उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल. जर दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर तो उपांत्य फेरीत सहज पोहोचेल.
हेही वाचा-
‘तुम्ही ट्रोलिंगला कसं सामोरे जाता?’ केएल राहुलच्या उत्तरानं जिंकली चाहत्यांची मनं!
ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना अनिर्णित! ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये एँट्री
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा, कांगारू संघाचा लज्जास्पद रेकॉर्ड!
Comments are closed.