कायद्याने घेतला महिलांचा बळी; अफगाणिस्तानातील भूकंपात पुरुषच का बचावले? जाणून घ्या कारण…

अफगानिस्तानच्या नंगरहर प्रांतातील जलालाबादजवळील भागात रविवारी 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपात 2,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकांना वाचवण्यात यश आले. तालिबान राजवटीत झालेल्या भूकंपात वाचलेल्यांमध्ये मुले आणि पुरुषांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात महिलांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या भूकंपात फक्त पुरूषांनाच वाचवण्यात यश आले तर मोठ्या प्रमाणात महिला मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्याला कारण म्हणजे तालिबान राजवटीतील एक कायदा आहे.

तालिबानमध्ये जर भूकंप, त्सुनामी यांसारख्या घटना घडल्या तर तेथे कायद्याद्वारे फक्त पुरूषांनाच वाचवले जाते. ‘लैंगिक कायदा’ असे या कायद्याचे नाव आहे. म्हणजे तेथे कोणताही पुरुष अनोळखी महिलेला स्पर्श करू शकत नाही. याच कायद्यामुळे महिलांना जीव गमवावा लागत आहे.

भूकंपानंतर जेव्हा लोक ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली तेव्हा प्रथम पुरुष आणि मुलांना वाचवण्यात आले. पण महिला आणि मुली ढिगाऱ्याखालीच राहिल्या. कारण तालिबानच्या नियमानुसार “अनोळखी पुरुष कोणत्याही महिलेला स्पर्श करू शकत नाहीत. जर घटनास्थळी महिला बचाव कर्मचारी उपस्थित नसतील तर जखमी महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढणे देखील कठीण होते. तालिबानच्या कायद्यानुसार, जर एखाद्या अनोळखी पुरुषाने महिलेला स्पर्श केला तर त्याला शिक्षा होऊ शकते.

अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत

तालिबान राजवटीत महिलांबाबत अनेक कडक नियम आणि कायदे आहेत, ज्यांना “लैंगिक कायदे” म्हणतात. यापैकी काही सर्वात महत्वाचे आहेत:

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्पर्श करण्यास मनाई
अफगाणिस्तानात , कोणतीही महिला तिच्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही पुरुषाला (वडील, भाऊ, पती किंवा मुलगा वगळता) स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच कोणताही पुरुष बचाव पथकाचा सदस्य ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेला मदत करण्यास घाबरतो.

महिला बचाव कर्मचारी किंवा डॉक्टरांची कमतरता
तालिबानने महिलांना वैद्यकीय आणि इतर व्यवसाय शिकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे तेथे महिला डॉक्टर, परिचारिका किंवा बचाव कर्मचारी नाहीत.

घराबाहेर पडण्यावरील निर्बंध
अफगाणिस्तानात महिला जवळच्या पुरुष नातेवाईकाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत.

महिला शिक्षणावर बंदी:
सहावीनंतर मुलींचे शिक्षण बंद केले जाते. यामुळे दीर्घकाळात महिला व्यावसायिकांची कमतरता निर्माण होते.

Comments are closed.