अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार, जलस्त्रोतांवर नियंत्रण; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात

तालिबान सरकारने मोठय़ा प्रमाणात कालवे आणि धरणे बांधण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानला स्वतःला शेती आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे तालिबान अफगाणिस्तानचे वाया जाणारे पाणी अडवणार आहे. यामुळे आशियाई देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानला जाणार्या कुनार नदीवर अफगाणिस्तान धरणे बांधू लागला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पाणीपुरवठा आणि प्रादेशिक स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
पहलगम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी रोखले होते. आता पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच अफगाणिस्तानकडून देखील पाण्याचे वांदे होणार आहेत. अफगाणिस्तानने इराण आणि पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान आता आपल्या देशातील नद्या आणि कालव्यांवर नियंत्रण स्थापित करण्याची योजना आखत आहे. तालिबानने अफगाणिस्तानातून इराण आणि पाकिस्तानला वाहून जाणारे त्यांच्या देशातील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नद्या आणि कालव्यांचे पाणी स्थानिक लोकांच्या वापरासाठी अडविले जाणार आहे. यामुळे इराणसह पाकिस्तान आणि उज्बेकिस्तानच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
Comments are closed.