अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाक सैन्यप्रमुख मुनीरचा सल्लागार ठार
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानच्या विविध सैन्य तळांवर भीषण हवाई हल्ले केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या हल्ल्याला अफगाणिस्तानने प्रतिहल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे.
अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमधील सैन्य तळांना लक्ष्य केले. यात पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील ‘फैजाबाद’ येथील सैन्य कॅम्पवर हल्ला करण्यात आला. नौशेरा येथील आर्मी कॅन्टोन्मेंटवर हवाई हल्ला झाला. जमरूदमधील सैन्य कॉलनीला लक्ष्य करण्यात आले. एबटाबादमधील महत्त्वाच्या सैन्य तळांवर बॉम्बहल्ला करण्यात आला.
अफगाणिस्तानने इस्लामाबादमध्ये केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सैन्यप्रमुख आसीम मुनीर याचा सल्लागार आशिक हा ठाकर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने हे सर्व ऑपरेशन्स यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मुख्य केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
Comments are closed.