टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी संघाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
टी20 वर्ल्ड कप 2026च्या तोंडावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. उजव्या खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे तो भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसह या महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतही खेळू शकणार नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) दिलेल्या माहितीनुसार, नवीन उल हकच्या अलीकडील मेडिकल रिपोर्टमध्ये त्याच्या उजव्या खांद्याच्या हाडामध्ये अजूनही स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुखापत पूर्णपणे बरी न झाल्यामुळे आणि सतत वेदना जाणवत असल्याने बोर्डाने त्यांना विशेष उपचारांसाठी युनायटेड किंगडमला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रिकव्हरीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे नवीन टी20 वर्ल्ड कप 2026 आणि वेस्ट इंडीजविरुद्धची टी20 मालिका दोन्ही गमावणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, टी20 वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या संघात नवीन उल हकचा आधीच समावेश होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीमुळे सिलेक्शन कमिटीने तात्काळ बदल जाहीर केला आहे. नवीन याच्या जागी जिया-उर-रहमान शरीफी याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. शरीफी यापूर्वी राखीव खेळाडूंच्या यादीत होता. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज फरीद मलिकला आता राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
नवीन उल हकची अनुपस्थिती अफगाणिस्तानसाठी मोठी कमतरता मानली जात आहे. तो संघाचा प्रीमियम गोलंदाज असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच भारतीय परिस्थितीत त्याला मोठा अनुभव आहे. आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये भारतात त्याने अनेक सामने खेळले असून, डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी अफगाणिस्तानसाठी नेहमीच प्रभावी ठरली आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026साठी अफगाणिस्तानचा संघ:
रशीद खान (कर्नाधर), नूर अहमद, अब्दुल्ला अहमदझाई, सेदीकुल्लाह अटल, फजलहक फारुकी, रहमानुल्ला गुरबाज, झिया-उर-रहमान शरीफी, मोहम्मद इशाक, शहिदुल्ला कमाल, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, दरविश रहिमरान, दारविश रा.
राखीव खेळाडू: ए.एम. गजनफर, एजाज अहमदजई आणि फरीद मलिक.
Comments are closed.