तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?


नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये 17 ऑक्टोबरला पाकिस्तानकडून रात्री उशिरा एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये तीन क्रिकेटपटूंसह नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे एक अपील केलं आहे. यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. जय शाह यांनी अफगाणिस्तानच्या तीन युवा खेळाडूंचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Jay Shah on Afghan Cricketer Death : जय शाह यांची पोस्ट

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात जय शाह यांनी अफगाणिस्तानचे तीन युवा क्रिकेटपटू कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारुन याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या तिघांची स्वप्न या नापाक हल्ल्यामुळं अपूर्ण राहिली, या तीन होतकरु क्रिकेटपटूंच्या निधनानं केवळ अफगाणिस्तान क्रिकेट नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं नुकसान झालं आहे. आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि ज्यांनी त्यांच्या प्रियजनांसह आहोत ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांनी गमावले आहेत.

आयसीसी कारवाई करणार?

जय शाह यांच्या वक्तव्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं एक पोस्ट केली आहे. जय शाह यांच्या भूमिकेचं त्यांनी सन्मान करत असल्याचं म्हटलं. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अपिलावर या हल्ल्या विरोधात आयसीसीकडून भूमिका मांडली गेल्यानं आभार मानत असल्याचं त्यांनी म्हटलं.  बोर्डानं पुढं म्हटलं की त्यांनी नेहमी क्रिकेटला राजकारणापासून वेगळं ठेवलं आहे. सर्व निर्णय आयसीसीच्या नियमानुसार घेतले आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याचं प्रकरण आयसीसीसमोर ठेवलं होतं. ज्यानंतर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी एक पोस्ट केली आहे. जय शाह यांनी या हल्ल्यावर टीका केली आहे. जय शाह यांनी तीन अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी जीव गमावणं हे अफगाण क्रिकेट सह संपूर्ण क्रिकेटची हानी असल्याचं म्हटलं. मात्र, जय शाह किंवा आयसीसीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याबाबत बोललं गेलं नाही.

पाकिस्तानवर बंदी येणार?

पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेले मोहसीन नक्वी हेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. अफगाणिस्तानवर झालेल्या हल्ल्यात तीन युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानं पाकिस्तानवर आयसीसीकडून बंदी घातली जाईल का याबाबत चर्चा सुरु आहेत. आयसीसी किंवा जय शाह यांनी त्याबाबत अद्याप काही संकेत दिलेले नाहीत.

दरम्यान, अफगाणिस्ताननं पुढील महिन्यात होणार्‍या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे. याशिवाय राशीद खान यानं देखील पाकिस्तान सुपर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.