रशियावर 25 वर्षांनंतर केंद्रीय बँकेतील सोने विकण्याची वेळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युद्धामुळे लष्करी खर्च वाढल्याने रशियावर केंद्रीय बँकेतील सोने विकण्याची वेळ आली आहे. अर्थसंकल्पीय तूट वाढल्याने रशियाला मागील 25 वर्षांपर्यंत सुरक्षित असलेले सोने बाहेर काढावे लागले आहे. सततच्या विक्रीमुळे रशियाचा सोन्याचा साठा आता चार वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, रशियाने 2022 ते 2025 या दरम्यान 15 ट्रिलियन रूबल म्हणजेच 150 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचे सोने आणि परकीय चलन विकले आहे. 2026 च्या पहिल्या दोन महिन्यातच अतिरिक्त 3.5 ट्रिलियन रूबल म्हणजेच 35 अब्ज डॉलर्स किमतीचा साठा विकला आहे.

Comments are closed.