IND vs ENG: अर्शदीपनंतर आकाशदीपही बाहेर, टीम इंडियासमोर मोठं संकट! चौथ्या टेस्टमध्ये कोण खेळणार ?
टीम इंडियाच्या (Team india) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मालिकेत 1-2 ने पिछाडीवर गेल्यानंतर आता शुबमन गिलच्या (Shubman gill) युवा संघाला दुखापतीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. नीतीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आधीच मालिकेबाहेर गेला आहे आणि अर्शदीप (Arshdeep Singh) देखील आधीपासूनच दुखापतीमुळे बाहेर आहे. आता कर्णधार शुबमन गिलने सांगितलं आहे की, आकाशदीप (Aakash Deep) देखील चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. आकाशला ग्रोइन इंजरी झाली आहे.
दोन मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यावर भारतीय संघासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. प्रश्न असा आहे की, ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात कोण खेळणार? कर्णधार गिलपुढे फक्त दोनच पर्याय उरले आहेत आणि त्यातून त्याला एका खेळाडूची निवड करायची आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात अर्शदीपनंतर आता आकाशदीपही प्लेइंग 11 चा भाग राहणार नाही. आकाशदीप दुखापतीमुळे चौथा कसोटी खेळणार नाही. आकाश बाहेर गेल्यानंतर भारतीय संघ मोठ्या अडचणीत आला आहे. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर जसप्रीत बुमराहला खेळवणं टीम इंडियासाठी आता गरजेचं झालं आहे. जस्सीला मोहम्मद सिराजची साथ मिळणार आहे.
त्यामुळे आता प्रश्न आहे की, तिसरा वेगवान गोलंदाज कोण असणार? कर्णधार गिलकडे प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज हे दोनच पर्याय आहेत.
प्रसिद्ध कृष्णा
प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळवण्यात आलं होतं. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्यावर जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आलं.
अनशुल कंबोज
अर्शदीप दुखापतीमुळे बाहेर गेल्यावर अंशुल कंबोजला संघात घेण्यात येणार आहे. अंशुलने सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत-A संघाचाही तो भाग राहिला आहे. अंशुलकडे वेग आहे आणि चांगली लाइन-लेंथही आहे. पण तो अजूनपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंशुलने 24 सामन्यांत 79 विकेट्स घेतल्या आहेत, तर लिस्ट-A क्रिकेटमध्ये 25 सामन्यांत 40 विकेट्स आहेत.
Comments are closed.