IND vs AUS: चौथ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल! हा स्टार खेळाडू बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेत आतापर्यंत 3 सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
मात्र, चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep yadav) संघातून रिलीज करण्यात आले आहे.
खरं तर, कुलदीप यादव भारतात परतणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करणार आहे. त्यामुळे तो चौथा आणि पाचवा टी-20 सामना खेळू शकणार नाही.
चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यासाठी बीसीसीआयने जाहीर केलेला संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.
Comments are closed.