हा माझ्या आयुष्यातला स्पेशल HandShake! अभिनेत्रीने किंग खानसाठी शेअर केली खास पोस्ट

एखाद्या चाहत्याला आपल्या आवडणाऱ्या कलाकारासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, तर तो आनंद काही वेगळाच असतो. खरंतर कलाकारांसोबत फोटो काढणे किंवा हात मिळवणे हे चाहत्यांचं स्वप्नंच असतं. एकदा हिरोसोबत हॅंड शेक केलं तर मग तो हात आपण इतर कोणत्याही व्यक्तीला अथवा वस्तूला लावत नाही. हा क्षण जरी लहान असला तरी तो एखाद्या कट्टर चाहत्यासाठी दिवाळी दसराच असतो. अशाच एक खास क्षण एका अभिनेत्रीने अनुभवला आहे.
नुकताच 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला त्याच्या “जवान” चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. किंग खानचा त्याच्या 33 वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार शाहरुख, त्याच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो राष्ट्रीय पुरस्कार ज्युरी सदस्य प्रकृती मिश्रा हिच्यासाठी तितकाच खास आहे. कारण यादरम्यान तिला शाहरूखला भेटण्याची संधी मिळाली. यावेळीच्या क्षणांचे काही फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
प्रकृतीने या फोटोंसोबत एक खास पोस्टही शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने लिहिलेय की, “माझी 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ज्युरीसाठी निवड झाली. जेव्हा माझी निव़ड झाली तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी शाहरुख सरांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी जबाबदार असलेल्या 11 सदस्यांच्या टीमचा भाग असेन. मला खूप आनंद आहे की मी या अविस्मरणीय क्षणाचा भाग होते.
जेव्हा मी या सोहळ्याचा हिस्सा बनले तेव्हा मला समजल ‘अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’, आज ही गोष्ट मला मनापासून पटली. शाहरूखला मिळालेला पुरस्कार मी स्वत अनुभवला आहे. शाहरुखचा हा विजय आपलासा वाटतो कारण तो प्रत्येक कलाकाराला स्वप्न पाहण्याची, जिंकण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची एक उमेद देतो. खूप खूप आभार शाहरूख सर, तुमच्या विनम्रतेला आणि मेहनतीने आम्हाला प्रेरित केल्याबद्दल, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रकृतीने आपल्या पोस्टमध्ये आणखी एका क्षणाचा उल्लेख केला आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान तिने शाहरूख खानसोबत फोटो काढले आणि हँडशेकही केला होता. यावर तिने म्हटले की, मी शाहरूख सरांसोबत handshake केल्यापासून माझे हातच धुतलेले नाहीत. आणि शेवटी शाहरूख खानचे अभिनंदनही केले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Comments are closed.