आज स्पष्ट सांगतो..’, भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरने प्रशिक्षक म्हणून आपल्या भविष्यासंदर्भात केलं मोठं वक्तव्य!
भारतीय संघाचा घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी पराभव केला आहे (Test series IND vs SA). प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Head Coach of team india) मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने घरेलू मैदानावर दुसरी कसोटी मालिका गमावली आहे. गुवाहाटी कसोटी सामन्यात तर भारतीय संघाला 408 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या कसोटी मालिकेदरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्यांच्या प्रशिक्षक म्हणून भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रशिक्षक गंभीर यांच्यावरचा दबाव सातत्याने वाढत आहे. घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत सलग दोन व्हाईटवॉशचा ठपका लावून घेणारा पहिला भारतीय कोट ठरला आहे. कसोटी प्रशिक्षक म्हणून त्यांच्या पहिल्याच वर्षात भारताला न्यूझीलंडविरुद्ध 0–3 असा मालिका पराभव पत्करावा लागला आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 अशा फरकाने मालिका गमावली आहे.
पत्रकार परिषदेतही माध्यमांनी गंभीरला त्यांच्या प्रशिक्षक म्हणून याबाबत थेट प्रश्न विचारला. एका पत्रकाराने थेट विचारलं की, तुम्ही अजूनही कसोटी संघाचे प्रशिक्षक म्हणून योग्य व्यक्ती आहात, असं आपल्याला वाटतं का? यासह भारताने घरेलु मैदानावरील शेवटच्या 7 कसोटी सामन्यांपैकी 5 सामने गमावले आहेत. गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून 19 पैकी तब्बल 10 कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर गंभीर म्हणाला, माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. मी जेव्हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हाच पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, ‘भारतीय क्रिकेट महत्त्वाचं आहे, मी नाही.’ आणि आजही मी इथे बसून अगदी तेच सांगतो.
पुढे गंभीर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकलेल्या मालिकांची आठवण करून दिली. लोक हे सतत विसरतात. मी तोच व्यक्ती आहे, ज्याने इंग्लंडमध्ये युवा संघाला मार्गदर्शन केलं होतं आणि ती मालिका अनिर्णित राहिली. अनेक जण न्यूझीलंडबद्दल बोलत असतात. पण चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy & Asia Cup) आणि आशिया चषकही संघ माझ्याच नेतृत्वाखाली जिंकले होते. हा संघ मात्र अनुभवाने कमी आहे आणि मी आधीही सांगितलं आहे, त्यांना शिकत रहावं लागेल आणि चांगली कामगिरी करण्यासाठी ते शक्यतोपरी सर्व प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाला.
Comments are closed.