इन्स्टाग्रामनंतर सोनिया गांधी आता 'एक्स'वरही सक्रिय आहेत

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आता ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय झाल्या आहेत. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये गांधी यांनी त्यांच्या आगामी पुस्तकाविषयी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनिया गांधी यांचे पहिले पुस्तक, ‘बिलॉन्गिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यामध्ये त्यांनी राजीव गांधींसोबतच्या आठवणी आणि त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले आहे. सुमारे दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्या केंब्रिजमध्ये राजीव गांधींना कशा भेटल्या हे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी स्वत:चे आणि राजीव गांधींचे फोटो तसेच ते पहिल्यांदा भेटलेल्या रेस्टॉरंटचा फोटोही अपलोड केला आहे.

Comments are closed.