After joining Shiv Sena Rajan Salvi targeted Vinayak Raut


राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी टीका केली होती की, राजन साळवी हे सामंत कुटुंबीयांच्या विरोधात आरोळी ठोकत होते. पण आता त्यांचीच गुलामी करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर ओढवली आहे. विनायक राऊत यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत राजन साळवी यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मुंबई : राजापूर विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात राजन साळवी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हेही उपस्थित होते. मात्र राजन साळवी यांनी हे जेव्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी टीका केली होती की, राजन साळवी हे सामंत कुटुंबीयांच्या विरोधात आरोळी ठोकत होते. पण आता त्यांचीच गुलामी करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर ओढवली आहे. विनायक राऊत यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत राजन साळवी यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (After joining Shiv Sena Rajan Salvi targeted Vinayak Raut)

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीला सामोरं जाताना मला पराभवाला सामोरे जावे लागले. याला जबाबदार कोण? हा प्रश्न मी आपल्यासमोर मांडलेला आहे. परंतु 2014 मध्ये भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार आलं. त्यावेळी मी मंत्री होईल, असे मला वाटले होते. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाची शिफारसही उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण दुर्दैवाने मी मंत्री होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांना मंत्री केले आणि राजन साळवी तिथेच राहिला, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हेही वाचा – Rajan Salvi : गंभीर आरोप करत ठाकरेंची साथ सोडली, राजन साळवींनी सांगितले खरे कारण

राजन साळवी म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीतही मला वाटलं होतं की संधी मिळेल. परंतु उदय सामंत हे शिवसेनेत आले आणि ते मंत्री झाले. यानंतर 2024 ला मला वाटलं होतं की, महाराष्ट्रात परिवर्तन झालं आहे. त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि माझं चुकलेलं मंत्रिपद मला मिळेल. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आनंद दिघेंकडून आलेली दैवी शक्ती आहे. म्हणून 2024 च्या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो. परंतु हा पराभव मला, माझ्या कुटुंबाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. कारण आम्ही ज्या विनायक राऊतांना मोठं केलं, त्यांनी किरण सामंत यांच्यासाठी काम केलं, असा गंभीर आरोप राजन साळवी यांनी यावेळी केला. तसेच त्यामुळेच आम्ही परत कुटुंबात (शिवसेनेत) येण्याचं ठरवलं, असे मत त्यांनी यांनी यावेळी मांडले.

हेही वाचा – Vaibhav Naik : राजन साळवींनंतर वैभव नाईक यांच्याकडूनही भूमिका स्पष्ट, ठाकरेंसोबत राहणार?



Source link

Comments are closed.