रोहित शर्माचं कर्णधारपद गेल्यानंतर पहिल्यांदाच गिल-रोहितची भेट! चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्यास आता फक्त 4 दिवस उरले आहेत. त्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. विमानतळावरील व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहलीही (Rohit Sharma & Virat Kohli) दिसणार आहेत. दोघांचा व्हिडिओ विमानतळावरून समोर आला असून, यात तो नव्या कर्णधार शुबमन गिलशी (Shubman gill) भेटताना दिसत आहेत. या दरम्यान हिटमॅनने गिलशी खास गप्पा मारल्या आहेत.
बीसीसीआयच्या (BCCI) व्हिडिओमध्ये, रोहित शर्माने युवा कर्णधार शुबमन गिलला भेटताना त्याची विचारपूस केली आणि दोघांनी मिठी देखील मारली. रोहित आणि शुबमन यांच्यात चांगला संवाद झाला. दोघेही भारतीय संघाचे सलामीवीर आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये दोघांची जोडी खूप उत्कृष्ट कामगिरी करत आहे. कर्णधारपद गमावल्यानंतर रोहितने स्टार शुबमन गिलला पहिल्यांदाच भेटले. त्यामुळे दोघांमधल नातं आधीप्रमाणेच छान दिसत आहे.
शुभमन गिल बीसीसीआयच्या या व्हिडिओमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे. त्याने विराट कोहलीचे खास अंदाजात स्वागतही केले.
या व्हिडिओमध्ये कर्णधार शुबमन गिलने सुपरस्टार विराट कोहलीचीही भेट घेतली. बसमध्ये किंग कोहली पुढच्या सीटवर बसलेला दिसत होता, जिथे संघाचा नवीन उपकर्णधार श्रेयस अय्यरही (Shreyas iyer) सोबत होता. कोहली आणि अय्यर यांच्यातही गप्पा चालू होत्या. गिल आणि विराट कोहलीची भेटही खूप खास होती. 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात दोघेही दिग्गज खेळाडू चांगली कामगिरी करून वनडे संघात आपली जागा पुन्हा पक्की करण्याचा प्रयत्न करेल.
रोहित आणि विराट आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
Comments are closed.