वनडे कर्णधारपद गमावल्यानंतर पहिल्यांदा रोहित आणि गौतम गंभीर आले समोरासमोर
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिकेसाठी गेला आहे. भारताला या दौऱ्यावर 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने एक मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या ऐवजी शुबमन गिलला देण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आता पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एकत्र फोटो समोर आला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. संघाने पहिला वनडे सामना खेळण्यापूर्वी सरावही सुरू केला आहे. भारतीय संघाने आज, (16 ऑक्टोबर) रोजी पर्थच्या पिचवर पहिले सराव सत्र घेतले. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही पर्थमध्ये सराव करताना दिसले. याच दरम्यान रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर एकत्र संवाद साधताना दिसले. गंभीर आणि रोहित यांचा एकत्र फोटोही समोर आला आहे. रोहितकडून वनडेचे कर्णधारपद गेल्यानंतर पहिल्यांदाच गंभीर आणि रोहित एकत्र बोलताना दिसले आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यांनंतर भारतीय संघासाठी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही स्टार खेळाडूंनी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहेत. पण वनडे मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे दोघे खेळताना दिसतील. रोहित आणि विराट पर्थमध्ये सराव करताना त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडत आहे. विराट आणि रोहित दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या दिवशी नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसले.
Comments are closed.