पुजारानंतर हे 3 भारतीय खेळाडू कधीही करू शकतात निवृत्तीची घोषणा, टीम इंडियात परतण्याची शक्यता कमी!
24 ऑगस्ट 2025 रोजी चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टीम इंडियाची ‘भिंत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराला बऱ्याच काळापासून भारतीय संघात संधी मिळत नव्हती. इंग्लंड दौर्यावर पुजाराला शेवटचा एक चान्स मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्यानंतर पुजाराने अखेर निवृत्ती जाहीर केली.
पुजारानंतर आणखी तीन भारतीय खेळाडू असे आहेत, जे कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतात. त्यापैकी एका खेळाडूने तर टीम इंडियाच्या जर्सीत आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता.
अजिंक्य राहणे
पुजारानंतर आता सगळ्यांचे लक्ष अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) लागले आहे. अलीकडेच रहाणेने रणजी ट्रॉफीत मुंबईच्या संघाचं कर्णधारपद सोडलं. त्याचबरोबर घरगुती क्रिकेटमध्येही त्याला पुरेशा संधी मिळत नाही. दुलीप ट्रॉफीत तर रहाणेला कोणत्याही संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे की, रहाणेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर कधीही पूर्णविराम देऊ शकतो.
उमेश यादव
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवही (Umesh Yadav) बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. उमेशने शेवटचा सामना 2023 मध्ये टीम इंडियाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळालेली नाही. आता उमेश 37 वर्षांचा झाला आहे आणि निवड समितीही त्याच्याकडे फारसे लक्ष देताना दिसत नाही.
इशंत शर्मा
भारतीय संघाला एकट्याने अनेक सामने जिंकून देणारा अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने (Ishaant Sharma) आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात परत येता आलेले नाही. त्यामुळे इशांत कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करू शकतो.
Comments are closed.