राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! राहुल द्रविड़नंतर CEO जॅक लश मॅक्रम यांनीही सोडली संघाची साथ!

राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) संघाला आयपीएल 2026 हंगामाच्या अगोदर मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीत मोठा बदल घडला आहे. आता संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेक लश मॅक्रम (Jake Lush Mccrum) यांनीही पद सोडले आहे. मॅक्रम 2017 पासून रॉयल्ससोबत जोडले गेले होते आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी फ्रँचायझीच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

द्रविड़ आणि मॅक्रम (Dravid & Mccrum) या दोघांच्या संघ सोडल्यानंतर रॉयल्ससमोर IPL 2026 हंगामापूर्वी मोठे नेतृत्व उभे करण्याचे आव्हान आहे. आता पुढील काही दिवसांत राजस्थान रॉयल्स नवीन व्यवस्थापन व प्रशिक्षकांची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बदलांमुळे संघाच्या आगामी मोहीमेवर कोणता परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

त्याचबरोबर फ्रँचायझीकडून द्रविड यांना संघामध्ये अधिक व्यापक जबाबदारीची भूमिका स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, द्रविड यांनी तो नाकारत प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.