आरसीबी सहित अजून एक चॅम्पियन टीम विकली जाणार? जाणून घ्या नव्या खुलाश्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सध्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. मागील काही महिन्यांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) विक्रीची बातमी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये जोरदार चर्चेत आहे. आता एका ताज्या रिपोर्टनुसार, फक्त RCB नाही तर राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझीला देखील लवकरच नवीन मालक मिळू शकतो.

खरंतर, भारतीय उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या एका नवीन सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेला वेग आला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून म्हटले, माझ्या माहितीप्रमाणे, फक्त एक नव्हे तर 2 IPL संघ विक्रीसाठी तयार आहेत. त्यांची नावे RCB आणि RR आहेत. हे स्पष्ट करते की आजकाल लोक ब्रँड मूल्याचा फायदा घेऊन नफा कमवू इच्छितात. या संघांच्या विक्रीसाठी 4-5 संभाव्य खरेदीदार असू शकतात. तर हे संघ कोण विकत घेईल? पुणे, अहमदाबाद, मुंबई, बेंगलुरु किंवा USA मधील कुणी?

RCB चे मालक आधीच सांगून गेले आहेत की, ते संघ विकणार आहेत. दुसरीकडे, RR फ्रँचायझीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही, पण त्यामुळे अफवा वाढल्या आहेत. RCB ने विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे, परंतु राजस्थान रॉयल्सच्या बाबतीत स्थिती अद्याप स्पष्ट नाही.

राजस्थान रॉयल्सचा मालकी हक्क सध्या रॉयल मल्टी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कडे आहे. RR फ्रँचायझीमध्ये सर्वात जास्त शेअर मनोज बडालेकडे आहेत, ज्यांना अमेरिकन इन्व्हेस्टमेंट कंपनी RedBird Capital Partners ची साथ आहे. अद्याप राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाकडून विक्रीबाबत कोणताही अधिकृत दावा आलेला नाही.

राजस्थान रॉयल्सने IPL 2026 च्या आधी आपल्या संघात अनेक मोठे बदल केले आहेत. राहुल द्रविड आता RR टीमचे कोच नाहीत. 2026 सत्रात ही जबाबदारी कुमार संगकारा सांभाळणार आहेत. तसेच, संघाने त्यांच्या माजी कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) सीएसके सोबत ट्रेड केले आहे. त्याची जागा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja and Sam Karan) आणि सॅम करन यांनी घेतली आहे. राजस्थान रॉयल्सने ऑक्शनपूर्वी एकूण 16 खेळाडूंना रिटेन केले होते.

Comments are closed.