“रिषभ पंतकडे स्वतःचा संगणक आहे, तोच त्याला चालवू…” 'या' माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया!
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका: रिषभ पंतने हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी आपल्या शानदार फलंदाजीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. भारताचा उपकर्णधार असलेल्या पंतने केवळ 178 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 6 षटकारांच्या मदतीने 134 धावांची दमदार खेळी केली. (Rishabh Pant Headingley century)
पैडल स्वीप, शतकानंतर केलेले गुलाटी सेलिब्रेशन. पंतच्या या संस्मरणीय खेळीत सौंदर्य आणि वेडसरपणा दोन्ही भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले. पंतच्या या अफलातून कामगिरीनंतर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतच्या खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले, “रिषभ पंत आकड्यांच्या खेळात सुंदरपणे खेळतो. तो आपला खेळ आपल्या पद्धतीने खेळतो. तो वेगाने परिस्थितीनुसार स्वतःचा खेळ बदलू शकतो. त्याच्याकडे स्वतःच्या मेंदूचा संगणक आहे आणि त्याला माहित आहे की तो कसा काम करतो. हीच त्याची खासियत आहे. त्यामुळे गोलंदाज दबावाखाली येतात आणि तो सुपरहिट ठरतो. तो खरा मनोरंजन करणारा आणि सामना जिंकून देणारा खेळाडू आहे.” (Ravi Shastri on Rishabh Pant)
3 वर्षांपूर्वी एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावलेला पंत मैदानात यशस्वी पुनरागमन करतो आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर मैदानात गुलाटी सेलिब्रेशन करणाऱ्या पंतबद्दल शास्त्री म्हणाले, “यामागे एक कारण आहे. तो त्या क्षणासाठी देवाचे आभार मानत होता.” (Ravi Shastri on Rishabh Pant)
शास्त्री पुढे म्हणाले, “त्या अपघातातून सावरून पुन्हा क्रिकेटमध्ये परतणं याच्याशी हे सर्व काही खूप निगडीत आहे. मी त्याला रुग्णालयात पाहिलं होतं. तेव्हा त्याची अवस्था काहीशी वाईट होती. गुडघे तुटलेले, सगळीकडे फक्त जखमा होत्या.” (Ravi Shastri on Rishabh Pant)
Comments are closed.