रोहित-विराटनंतर आता हा धुरंधरही विजय हजारे ट्रॉफीमध्ये माजवणार धुमाकूळ, या दिवशी होणार पुनरागमन!

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 खास ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेचा भाग असतील. बीसीसीआयने (BCCI) राष्ट्रीय संघातील सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता. याच कारणामुळे रोहित, विराट, गिल आणि हार्दिक यांच्यासह अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. आता भारतीय क्रिकेटमधील आणखी एक तारा या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

टीओआय’ने (TOI) आपल्या अहवालात म्हटले आहे की, रवींद्र जडेजा सौराष्ट्रसाठी विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला असून रवींद्र जडेजा 6 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी सौराष्ट्रकडून खेळताना दिसेल. तो या स्पर्धेत दोन सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, सौराष्ट्रचा 9 जानेवारीला ‘सर्विसेस’ विरुद्ध आणि (8 जानेवारी 2026) रोजी ‘गुजरात’ विरुद्ध सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये जडेजाची साथ सौराष्ट्रला मोठा फायदा मिळवून देऊ शकते.

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, जर रवींद्र जडेजाची न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी निवड झाली, तर त्यांच्या नियोजनात बदल होऊ शकतो. खरं तर, 11 जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड दरम्यान एकदिवसीय मालिका सुरू होत आहे आणि त्यासाठी टीम इंडियाला लवकर एकत्र यावे लागेल. याच कारणामुळे विराट, रोहित यांच्यासह इतर खेळाडू विजय हजारे ट्रॉफीचे सुरुवातीचे काही सामने खेळत आहेत. सध्याच्या नियोजनानुसार, जडेजा विजय हजारे ट्रॉफीचे दोन सामने खेळणार आहे.

रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्थान मिळाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याचे पुनरागमन झाले. या मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने एक विकेट घेतली आणि दोन डावांत 56 धावा केल्या. जडेजाची कामगिरी तितकीशी खास झालेली नाही. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

Comments are closed.