IND vs WI: यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीचं इरफान पठानकडून भरभरून कौतुक, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने (IND vs WI 2nd Test) शानदार शतक झळकावले. दिवस संपताना तो 173 धावा करून क्रीजवर होता. या खेळीमुळे यशस्वी जयस्वालचे पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी आणि तज्ज्ञांनी त्याचे कौतुक केले.
माजी अष्टपैलू इरफान पठाननेही (Irfan Pathan on Yashsvi jaiswal) यशस्वी जयस्वालची प्रशंसा केली आहे. इरफान पठानने सोशल मीडियावर (X) पोस्ट करत जयस्वालचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, यशस्वी जयस्वालची आणखी एक मोठी खेळी. सध्या हा खेळाडू कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम डाव्या हाताचा सलामी फलंदाज आहे. त्याची आकडेवारी हेच दर्शवते.
इरफानसह मोहम्मद कैफ (Mohmmed kaif) आणि वसीम जाफरसारख्या (Vasim jafar) दिग्गजांनीही जयस्वालचे कौतुक केले. कैफने X वर लिहिले, यशस्वी जयस्वाल सतत कसोटीमध्ये शतक करत राहतो. खेळाविषयी त्याची निष्ठा सर्व युवा क्रिकेटपटूंसाठी एक धडे आहे. माजी भारतीय सलामी फलंदाज वसीम जाफरने लिहिले, तो क्रीजवर टिकला की धावा सतत येतात. आणखी एक शानदार शतक, छान यशस्वी जयस्वाल, असेच खेळत रहा.
यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने 253 चेंडूत 22 चौकारांच्या मदतीने 173 धावा केल्या.
यशस्वी जयस्वालचे हे सातवे कसोटी शतक आहे. या डावापूर्वी 25 कसोटी सामन्यांतील 42 फलंदाजीत त्याने 2 वेळा नाबाद राहून 6 शतक आणि 12 अर्धशतकांसह 2,245 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 49.88 आहे. यशस्वीने आतापर्यंत 2 द्विशतकही झळकावले आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोर 214 आहे. हा डाव्या हाताचा सलामी फलंदाज फक्त 23 वर्षांचा असून, त्याच्या फलंदाजी क्षमतेमुळे तो भविष्याचा मोठा स्टार मानला जात आहे.
Comments are closed.