सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीही इथे फलंदाजी करू शकले नसते! पराभवानंतर कोलकाता खेळपट्टीवर हरभजनचा संताप

कोलकाता ईडन गार्डन्सवरील कमी धावसंख्येच्या कसोटीमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिकेच्या स्पिनर सायमन हार्मरसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे कोलमडले. या पिचवर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी जोरदार टीका केली आणि ती खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी “थट्टा” असल्याचे म्हटले.

हरभजन म्हणाले, या खेळपट्टीवर कौशल्यापेक्षा नशिबाची लढाई होती. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar & Virat Kohli) किंवा विराट कोहलीसारखे मोठे फलंदाजही या विकेटवर टिकले नसते. चेंडू कधी उंच उडत होता, कधी खाली जात होता. अशी खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नाही.

त्यांनी सांगितले की, चाहत्यांनी मोठ्या उत्साहाने सामना पाहायला गर्दी केली, पण पिचने निराश केले. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 159 धावांत बाद झाली, भारताने 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. पण ही 30 धावांची आघाडी जणू 300 धावांची असल्यासारखी भासत होती. हे कसोटी क्रिकेटसाठी चांगले लक्षण नाही.

हरभजन पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतात अशा अनेक खराब खेळपट्टी दिसल्या, ज्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा उडते. इंग्लंड दौऱ्यावर दोन्ही संघांनी उत्तम क्रिकेट खेळले होते, तोच कसोटीचा खरा दर्जा. पण कोलकाता कसोटी “पूर्ण बकवास” होती.

सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा हार्मर चमकला आणि त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. भारत 124 धावांचे छोटे लक्ष्यही पार करू शकला नाही आणि 93 धावांतच गारद झाला.

Comments are closed.