दुखापतीनंतर रिषभ पंतला आणखी एक मोठा धक्का! यशस्वी जयस्वाल देखील अडचणीत
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये आशिया कप 2025 (Asia Cup 2025) विषयी मोठी चर्चा सुरू आहे. काही खेळाडूंना संघात संधी मिळण्याची बातमी येत असताना, काहींची जागा जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टी20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या काही खेळाडूंनाही यावेळी संधी मिळणे कठीण दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटने कमाल करणाऱ्या विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) आणि सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) यांच्यासाठीही वाईट बातमी समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आता रिषभ पंतला टी20 फॉरमॅटच्या योजनेत सामील करत नाही. व्यवस्थापनाचा भर सध्या संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. संजू गेल्या वर्षभरापासून टी20 संघाचा भाग आहे आणि त्याने स्वतःला सिद्धही केले आहे. पहिल्या पसंतीसाठी संजू सॅमसनला संधी मिळत असताना, दुसऱ्या पसंतीसाठी जीतेश शर्माचे (Jitesh Sharma) नाव पुढे येत आहे.
या बदलामुळे भारतासाठी 76 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला पंत आता रेसमधून बाहेर पडताना दिसत आहे. पंतने 76 सामन्यांच्या 66 डावांत 1209 धावा केल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतके सामील आहेत.
फक्त पंतच नाही, तर या रिपोर्टनुसार सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) हाही सध्या टी20 फॉरमॅटमध्ये व्यवस्थापनेच्या योजनेत नाही. कारण सलामी फलंदाज म्हणून अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) अफाट कामगिरी केली असून तो सध्या क्रमांक 1 टी20 फलंदाज आहे. त्यामुळे अभिषेक पुढेही खेळताना दिसेल, तर जयस्वालला सध्या संधी मिळणे कठीण आहे.
जयस्वालने 23 टी20 सामन्यांच्या 22 डावांत 723 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 5 अर्धशतके समाविष्ट आहेत.
Comments are closed.