विराट-रोहितनंतर कोण पुढे नेईल सचिनची परंपरा? मास्टर ब्लास्टरचा खास खुलासा!

तुम्हीही कधी ना कधी एक व्हिडिओ नक्की पाहिला असेल, ज्यात अभिनेता सलमान खान सचिन तेंडुलकरला विचारतो, कोणी आहे का जो तुझे विक्रम मोडू शकेल? त्यावर सचिन उत्तर देतो, विराट आणि रोहित असे आहेत जे माझे विक्रम मोडू शकतात. ही गोष्ट त्यांनी त्या कार्यक्रमात सांगितली होती, जिथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील “शतकांचा शतक” साजरा केला जात होता. ही गोष्ट साधारण 15 वर्षांपूर्वीची आहे. मात्र सचिन यांची ती भविष्यवाणी अगदी खरी ठरली.

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी सचिननंतर भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली आणि धावांचा वर्षाव केला. पण आता विराट आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तसेच वनडे क्रिकेटमधूनही ते लवकरच निवृत्त होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कसोटी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सध्या युवा शुबमन गिलकडे (Shubman gill) आहे. संघ बदलाच्या टप्प्यात आहे आणि अनेक खेळाडू आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी सांगितले की, सध्याच्या तरुण खेळाडूंमध्ये क्षमता आहे आणि त्यांच्यातील अनेक जण त्यांची परंपरा पुढे घेऊन जाऊ शकतात.

सोमवारी सचिन तेंडुलकर यांनी चाहत्यांसोबत रेडिटवर प्रश्नोत्तर सत्र घेतले. त्यावेळी एका चाहत्याने विचारले, आपण 2010 च्या सुमारास म्हटलं होतं की कोहली आणि रोहित तुमची परंपरा पुढे नेतील आणि तुम्ही अगदी बरोबर ठरलात. आता तुम्हाला काय वाटतं, हे पुढे नेण्यासाठी कोण योग्य ठरेल?

यावर सचिन तेंडुलकर म्हणाले, हो, विराट आणि रोहित यांनी अनेकदा भारताला गौरव मिळवून दिला आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे. त्यांनी इंग्लंडमध्येही उत्कृष्ट खेळ केला. वारसा पुढे नेण्यासाठी अनेक दावेदार आहेत. त्याच सत्रात सचिन यांना विचारण्यात आलं की, त्यांची आवडती खेळी कोणती? त्यावर ते म्हणाले, अशा अनेक इनिंग्स आहेत, पण सर्वात महत्त्वाची 2008 मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्ध खेळलेली खेळी आहे.

एका चाहत्याने विचारलं, जर तुम्ही क्रिकेटर नसता, तर कोणता व्यवसाय निवडला असता?” त्यावर सचिन म्हणाले मी टेनिसपटू झालो असतो.

Comments are closed.