तब्बल 85 हजार व्हिसा रद्द, व्हाईट हाऊस परिसरातील गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनाची कारवाई; 30 देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेशबंदी

व्हाईट हाऊस परिसरातील गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांची झाडाझडती सुरू केली आहे. या झडतीअंती पहिल्या टप्प्यात विविध प्रकारचे तब्बल 85 हजार व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

अमेरिकेने याआधीच तब्बल 30 देशांतील स्थलांतरितांना प्रवेशबंदी केली आहे. नव्या कारवाईबाबत अमेरिकी गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. त्यानुसार, अपात्रता, मुदतीपेक्षा जास्त दिवस निवास, गुन्हेगारी कारवाया, सार्वजनिक सुरक्षेला धोका, दहशतवादाशी संबंध किंवा दहशतवादी संघटनांना पाठिंबा असे विविध निकष लावून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात 8 हजार विद्यार्थी आहेत.

Comments are closed.