निवृत्तीच्या बातमीवर जडेजा गप्प; विजयानंतर रहस्यमय पोस्ट
9 मार्च रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने विजेतेपद जिंकले. भारत चॅम्पियन झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने स्पष्ट केले की तो अद्याप निवृत्त होत नाही. पण रवींद्र जडेजाच्या निवृत्तीबद्दल अजूनही अटकळ बांधली जात होती.
आता रवींद्र जडेजाने त्याच्या निवृत्तीबाबत मौन सोडले आहे. जडेजा म्हणाला की, “सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नाही.” सोमवारी जड्डेजाने एक इंस्टा स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका अशी विनंती केली. जडेजाने लिहिले, “कोणत्याही अनावश्यक अफवा पसरवू नका, धन्यवाद.”
रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात योगदान दिले. विजेतेपदाच्या सामन्यात जडेजाने गोलंदाजीत 30 धावा देऊन 1 बळी घेतला. फलंदाजी करताना तो 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 6 चेंडूत 9 धावा काढून नाबाद राहिला. त्याने अंतिम सामन्यात विजयी फटकाही मारला. रवींद्र जडेजाने भारतासाठी 80 कसोटी, 204 एकदिवसीय आणि 74 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी20 मधून निवृत्ती घेतली.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला की, त्याचा फलंदाजीचा आकडा असा आहे की तो कधी हिरो असतो तर कधी शून्य. अंतिम सामन्यात त्यांच्यासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने चांगली भागीदारी केली. जडेजा म्हणाला की, ही विकेट प्रथम फलंदाजीसाठी चांगली नव्हती. तो म्हणाला, भारतासाठी खेळणे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही चॅम्पियन संघांचा भाग नसता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो. जडेजा स्वतःला भाग्यवान मानतो की तो तंदुरुस्त राहिला आणि 2024 च्या टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन स्पर्धांमध्ये भारताच्या विजयात योगदान देऊ शकला.
हेही वाचा –
पांढरा ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांसाठीच! यामागचं गुपित काय?
अनुष्का शर्माकडुन भारतीय खेळाडूंचं खास अभिनंदन, कर्णधार रोहितसह, हार्दिक पांड्याला दिल्या शुभेच्छा
मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द, खेळाडू स्वतंत्रपणे घरी जाणार!
Comments are closed.