सांगलीच्या जीडीपी वाढीत ‘कृषी’चा मोठा वाटा, सांगलीकरांचे दरडोई उत्पन्न तीन लाखांवर
यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या सांख्यिकी विभागाकडून सांगली जिह्याचा जीडीपी आलेख प्रसिद्ध केला आहे. जिह्याच्या दरडोई उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. या जीडीपी वाढीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
सांगली जिह्यात कृषी उद्योग सहकार वाहतूक व्यापार आणि व्यवसाय अधिक क्षेत्रातील उलाढालीत वाढ होत आहे. गेल्या 20 वर्षांत जिह्याचे उत्पन्न 13 पटीने वाढल्याचे आकडेवारी सांगते. साखर कारखाने, बांधकाम क्षेत्र याचाही यामध्ये मोठा वाटा आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांमुळे बागायती क्षेत्र आणि उत्पादन वाढले आहे. जिह्याचे दरडोई उत्पन्न 2000 ते 2001 मध्ये 21 हजार 818 होते, ते 2024 पर्यंत दोन लाख 42 हजार 846 रुपये गेले. सध्या सांगलीकर नागरिकांचे दरडोई उत्पन्न तीन लाख रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत दहापट वाढ झाली आहे.
सांगली जिह्याची लोकसंख्या 30 लाखांवर पोहोचली आहे, तर जिह्याची वार्षिक उलाढाल 70 हजार कोटी रुपये आहे. ती एक लाख 77 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जिह्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक झाला आहे. त्या खालोखाल उद्योग, बांधकाम क्षेत्रात याचा समावेश आहे. निर्यात वाढून अधिकाधिक परकीय चलन जिह्यात आणायचे आणि जिह्याचा जीडीपी वाढवायचा, असे शासनाचे नियोजन आहे.
गेल्या 25 वर्षांत जिह्याचे दरडोई उत्पन्न तीन लाखांवर पोहोचले आहे. हे उत्पन्नवाढ 10 पटीने आहे. हे उत्पन्न वाढ होण्यास सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा, वाढते महामार्ग, व औद्योगिकरण, बांधकाम क्षेत्रातील उलाढाल, यामुळे हा जीडीपी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments are closed.