प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घ
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा प्रकार अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरातील केडगाव (Kedgaon) उपनगरात घडला आहे. प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार झालाय. संतोष देवरे असे प्राचार्याचे नाव असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील केडगाव उपनगरातील एका प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय.
आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार
संतोष देवरे या नराधमाने संबंधित विद्यार्थ्याला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना झाली आहेत. प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल : अमोल भारती
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती म्हणाले की, एका खासगी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष देवरे याने त्याच्या शाळेतील नऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. बालक आणि प्राचार्य एकच इमारतीत वास्तव्यास आहे. प्राचार्याने शाळा सुटल्यानंतर बालकाला स्वतःच्या रूमवर बोलावून त्याच्यासोबत अश्लील चाळे केले, अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.