माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्…; अहिल्यानगरमधील खळबळजन
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरच्या देहरे गावातील (Dehare village) एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी आरोपींची नावे आहेत, त्यातील तन्वीर शेख याने संबंधित महिलेवर अत्याचार केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेची आणि आरोपी तन्वीर शेख यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर तन्वीर शेख हा नेहमी त्या महिलेस मेसेज करत होता. मात्र,, संबंधित महिला त्याच्यासोबत केवळ गावातील व्यक्ती म्हणून बोलत होती. मात्र, हे प्रकरण वाढत जाऊन तन्वीर शेखने त्या महिलेला वारंवार मेसेज आणि कॉल करण्यात सुरुवात केली. हे पाहून महिलेने तन्वीर शेख यास यापुढे मला मेसेज आणि कॉल करू नको असे सांगितले.
माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी बदनामी करेन
महिलेचा राग आल्यानंतर तन्वीरने त्या महिलेस धमकी देण्यास सुरुवात केली. जर माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आपले मेसेज आणि फोन कॉल तुझ्या नवऱ्यासह कुटुंबातील सर्व व्यक्तींना दाखवून तुझी बदनामी करेल. सोबतच संबंधित महिलेला घरातील पैसे आणि दागिने घेऊन या आरोपीने बोलवले आणि या महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आमदार संग्राम जगतापांचा इशारा
दरम्यान संपूर्ण घटनेनंतर गावात एकच संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एका महिलेसोबत परप्रांतीय मुस्लिम तरुणांनी असे कृत्य केले याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. जे मुस्लीम समाजाचे लोक गावात राहत आहेत त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मुस्लीम लोक गावात येऊन अतिक्रमण करतात, त्यांनी या भागात घर आणि व्यवसाय थाटले आहेत. याच लोकांकडून गावातील महिलेसोबत असा प्रकार करण्यात आलाय. आता मुस्लीम समाजाच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायावर प्रशासनाने बुलडोजर चालवावा, प्रशासनाने तसे केले नाही तर मंगळवारी हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.