नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार, अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शाळेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीवर विविध ठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कळमकर फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली असून, कळमकर यांनी ब्लॅकमेल केल्याचे काही व्हिडीओ पुरावेही म्हणून पोलिसांकडे जमा केले आहेत. तसेच मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर अहिल्यानगर शहर, तसेच पुणे जिह्यातील शिरूर येथे लॉजवर बोलावून अत्याचार केला. अत्याचार करतानाचे व्हिडीओ रेकार्ंडग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचेही तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. अभिषेक कळमकर हे अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष असून, या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Comments are closed.