जामखेडच्या नर्तिकेने लॉजमध्ये गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं, भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक


Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये शुक्रवारी कला केंद्रात नाचणाऱ्या एका नर्तिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिपाली गोकुळ पाटील (वय 35) असे या नर्तिकेचे नाव आहे. तिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात आता भाजपशी संबंधित असलेल्या संदीप सुरेश गायकवाड याचे नाव समोर आले आहे. संदीप गायकवाड (Sandeep Gaikwad) हा भाजपचा (BJP) माजी नगरसेवक आहे. तो लग्न करण्यासाठी दिपाली पाटील हिच्या मागे लागला होता. त्यासाठी संदीप गायकवाड तिच्यावर सतत दबाव आणत होता. याच दबावापोटी दिपाली पाटील हिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (35) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

Dancer Dipali Patil: नेमकं काय घडलं?

दिपाली पाटील ही मूळची कल्याण येथील रहिवासी होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. तसेच, दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. त्यामुळे, मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता.

आणखी वाचा

तृतीयपंथीयाला प्रेमप्रकरणात फसवलं, 12 वर्षांच्या संबंधांचा जीवघेणा ‘द एन्ड’; गुरू अन् नातेवाईकांचे गंभीर आरोप

आणखी वाचा

Comments are closed.