अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ता खचला, जनावरं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत

अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एका दिवसात तालुक्यातील सातही मंडळात 70 ते 80 मिमी पावसाची नोंद होत आहे. सातही मंडळात सरासरी शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकतीच केलेल्या कांदा पीकात तळे साचले असून सोयाबीन पीके काढणीस आलेली आहेत. मात्र आता ती पिकेही पाण्यात आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला तर उरलेले पीक सडून जाईल अशी
भिती शेतकऱ्यांना सतावत आहे.

तालुक्यातील अनेक पुलावरून पाणी गेल्याने पुल खचले आहेत. रस्ते उखडले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहरी तलावाचा सांडवा फुटला होता. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून नागरिक जखमी झाले आहेत. तर पशूधनही मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे.

पीके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस दररोजच येत आहे. शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेते खणून गेले आहेत. पीके पाण्यात शेतात तळे यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Comments are closed.