Ahilyanagar News – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी
महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे महाभयंकर पुरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावच्या गाव उद्ध्वस्त झाली आहेत, शेतजमीनी खरडून गेल्या आहेत, जनावरे व गुरेढोरे मृत्यूमुखी पडले आहेत, संसार डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा शुन्यातून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पुरग्रस्तांना भरघोस मदत करत संपूर्ण कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या संभाजी ब्रिगेडने सरकारकडे केल्या आहेत.
सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन छेडले. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली आहे. या भीषण परिस्थितीमुळे येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई तसेच शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
जिल्हा अध्यक्ष राजेश गणत राव यांनी वेगळे केले, श्री गोंडा तालुक अध्यक्ष इंजे. शाम जारे, पर्नियर तालुकचे अध्यक्ष सचिन काकाडे, तसेच सुयोग डीएचए, दिलीप वलोजा, बापू जगत, अचूत टेक, तती तात्य, अंबादस जाधव, सारदीप जाधव, सारदीप जाधव, उत्ना, सारद्यद, सारद्यद, सॅबॅली उपस्थित.
Comments are closed.