Ahilyanagar News – इमामपूर घाटात 9 तास वाहतूक ठप्प, वाहन चालकांना मनस्ताप

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटात अनेक वाहने बंद पंडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन तब्बल 9 तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सुद्धा विशेष प्रयत्न करावे लागले.
नगर व छत्रपती संभाजीनगर रोडवर इमामपूर घाट व पांढरीच्या पुलावर गेल्या काही दिवसांत झालेल्या सलग पावसामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. नगर व छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या राज्य महामार्गावर महत्त्वाच्या या घाटातील पुलावर पावसामुळे खोल खड्डे पडल्याने अनेक वाहने तिथे बंद अवस्थेत पडून अडकल्याने सुमारे 9 ते 10 तासांपर्यंत वाहनचालकांना रहदारीत अडकावे लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे. पांढरीचा पूल हा इमामपूर घाटातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असून, येथे सलग पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तसेच घाटात उभ्या राहिलेल्या वाहनांमुळे ट्राफिक पूर्णपणे ठप्प झाली. मोठी आणि छोटी वाहने सुमारे सहा तास घाटात अडकून राहिली. पोलीस प्रशासनाकडून जलद कारवाई व्हावी, अशी अपेक्षा वाहन चालकांनी व्यक्त केली.
Comments are closed.