Ahilyanagar news – जामखेडला पावसानं झोडपलं; घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जनावरं दगावली

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्याने कोसळत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे भिंत अंगावर कोसळून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला, तर 9 जनावरे दगावली आहेत.
पिंपळगाव उंडा येथे किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे हे दाम्पत्य पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जुन्या इमारतीचा भिंतीचा भाग पत्र्याच्या घरावर कोसळला. याखाली दबल्याने पारूबाई (वय – 75) गंभीर जखमी झाल्या. त्यांना ताबडतोब जामखेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू
Comments are closed.