अहिल्यानगरात शिंदे गटाला झटका, एकूण पाच उमेदवारांचे अर्ज बाद, एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी करणे भोवले

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला जोरदार झटका बसला आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांनी एबी फॉर्मवर केलेली खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी आणि अर्जासोबत झेरॉक्स प्रत जोडणे आदी चुका भोवल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख मंगळवारची होती. बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत सत्ताधारी शिंदे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यापैकी एक अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्याने बाद झाला, तर इतर चार अर्ज एबी फॉर्म न जोडणे, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणे व जोडलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करणे आदी कारणांमुळे बाद ठरवण्यात आले. यामुळे महापालिकेच्या 54 जागा लढवणार्या शिंदे गटाचा आकडा 49 वर घसरला आहे. विशेष म्हणजे बहुतांश प्रभागांतील उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जांवर विविध आक्षेप नोंदवले. यात महापालिकेचा कर थकवणे, रस्त्यांवर अतिक्रमण करणे, अवैध बांधकाम करणे, अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, अर्जाच्या प्रस्तावकाची खोटी स्वाक्षरी आदी तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तत्काळ सुनावणी घेत या तक्रारींची पडताळणी केली. त्यात ज्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले ते अर्ज अवैध ठरवण्यात आले. दरम्यान, एकूण पाच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरल्यामुळे िंशदे गटावर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे..

Comments are closed.