श्रीगोंद्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह, भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा, शिंदे अन् अजितदादांच्या रा
Ahilyanagar Shrigonda Election 2025: नगरपंचायत (Nagar Panchayat), नगरपरिषद (Nagar Parishad) निवडणुकांचे (Election 2025) पडघम वाजले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये. श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजप विरुद्ध मविआ विरुद्ध राष्ट्रवादी AP, शिवसेना शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता सध्या दिसत आहे.
भाजपच्या वतीने आज कोअर कमिटी बैठक बोलावण्यात आली आहे. श्रीगोंद्याचे भाजपचे विद्यमान आमदार हे भाजपचे विक्रमसिंह पाचपुते आहेत. भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी भाजपचा स्वतंत्र लढण्याचा मानस असल्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय. सोबतच निवडणूक जरी पालिकेची असली तरी बैठक तालुक्यातील कार्यकर्त्यांची बोलावण्यात आले आहे, युतीबाबत जो काही निर्णय होईल तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही तोच निर्णय राहील, असं आमदार पाचपुते यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी भाजपकडून 100 अधिक इच्छुक उमेदवार आहेत. उद्याचा नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे असं पाचपुते म्हणाले. तर श्रीगोंद्यामध्ये नेहमी प्रमाणेच पाचपुते विरुद्ध इतर सर्व पक्ष अशीच परिस्थिती राहील. या निवडणुकीत भाजपला चांगल यश मिळेल, असा विश्वास देखील विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केलाय.
Ahilyanagar Shrigonda Election 2025: शिंदे गटाचे मनोहर पोटे यांची प्रतिक्रिया
तर, श्रीगोंदा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोहर पोटे यांच्या पत्नी शुभांगी पोटे या गेल्यावेळी नगराध्यक्षा होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपचे 11 उमेदवार निवडून आले होते तर राष्ट्रवादीचे 8 उमेदवार निवडून आले होते. भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असताना राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाला होता. त्यामुळे जनतेने पोटे यांना कौल दिला होता. मनोहर पोटे हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. महायुतीत असतांनाही ते त्यांचा वेगळा सुभा मांडतील, असं चित्र आहे. दरम्यान सध्या आम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी चर्चा करत असून भाजपमध्ये इच्छुकांची संध्या अधिक असल्याने आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा मानस ठेऊन आहोत, असं पोटे म्हणाले आहेत.
Ahilyanagar Shrigonda Election 2025: काय म्हणाले शरद पवार गटाचे बाबासाहेब भोस?
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब भोस यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला तसेच इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा पॅनल करण्याची तयारी सुरू केलीये. सुरुवातीला आम्ही सर्वांनी भाजप विरोधी पॅनल करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने आम्हाला विचारत घेतले नाही आणि तुम्ही तुमचा निर्णय स्वतंत्र घ्यावा असं म्हटल्याने आम्ही स्वतंत्र मविआ पॅनल करण्याचा निर्णय घेतल्याचे भोस यांनी म्हटले आहे. एकूणच श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तिरंगी होणार आहे. त्यातच महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी AP आणि शिवसेना शिंदे गट देखील वेगवेगळे लढणार असल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.