दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांकडून धक्कादायक माहिती


अहिल्यानगर : जामखेड येथील साई लॉजमध्ये Nartika dapali Gokul Patil (देपाली पाटील) (वय 35, रा. कल्याण, सध्या जामखेड) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाजपचा (BJP) माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड (Sandeep Gaikwad) याला जामखेड पोलिसांनी (Police) अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दिपालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अशातच आता याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. दिपालीने आत्महत्या करण्याच्या काही वेळ आधी संदीप गायकवाड हा दिपाली वास्तव्यास असलेल्या लॉजमधील रुममध्ये गेल्याचं सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते साडेबारा वाजताच्या सुमारास दिपाली पाटील या साई लॉजमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मागून संदीप गायकवाड हादेखील दिपाली पाटील असलेल्या रुममध्ये गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं आल्याची माहिती जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळं संदीप गायकवाड याने साई लॉजमधील रूममध्येही दिपाली पाटीलला काही त्रास दिला आहे का? याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

संदीप सुरेश गायकवाड हा दिपालीला सतत लग्नासाठी मागणी करत होता, त्रास देत होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील जामखेडमधील तपनेश्वर भागात मैत्रिणींसोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी ती “बाजारात जाते” असे सांगून घराबाहेर पडली. अनेक तास उलटल्यानंतरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. चौकशीत रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याचे सांगितले. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता दिपालीने गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी दिपालीवर लग्नासाठी दबाव आणणाऱ्या संदीप गायकवाडविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असून त्याचे नाव या प्रकरणात प्रमुखत्वाने समोर आले आहे. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप सुरेश गायकवाड हा दिपालीला सतत लग्नासाठी मागणी करत होता. पण तीने नकार दिल्याने तिला त्रास देत होता.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप सुरेश गायकवाडवर कलम 108 भादवी (BNS108 प्रमाणे 648 / 2025) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपालीचे आई-वडील आणि नातेवाईक कल्याण येथील रहिवासी आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दिपालीच्या मृतदेहावर पुढील विधींसाठी पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, अंत्यसंस्कार कल्याण येथे होणार आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये नर्तिका दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, भाजप नेत्याला अटक, चित्रा वाघ म्हणाल्या, ‘देवाभाऊ कोणालाही माफी देणार नाहीत…’

आणखी वाचा

Comments are closed.