गंभीरच्या अंतर्गत राजकारणामुळे टीम इंडियाचा पराभव, पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक आरोप

अहमद शेहजाद: भारताचा टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 मधील लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला होता. या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर 107 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. तर, दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. यामुळं भारत उपांत्य फेरीत कशाप्रकारे पोहोचणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 76 धावांनी पराभव झाल्यानंतर, कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) अनुपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच वरुण चक्रवर्तीला रेअर ऑफ डे मिळाला, ज्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी घेतला आणि विजय निश्चित केला. त्यामुळे भारताकडे प्लॅन बीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अहमद शहजादने एक (Ahmed Shehzad) धक्कादायक दावा केला आहे. ज्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवसोबतच्या कथित मतभेदामुळे कुलदीपला वगळण्यात आल्याचा अंदाज त्याने वर्तवला आहे.

गौतम गंभीरवर अहमद शहजाद: गौतम गंभीरद्वारे भारतीय संघाच्या वातावरणात राजकारण आणलं

अहमद शहजादने कुलदीप यादवच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून अनुपस्थितीबद्दल एक खळबळजनक टिप्पणी केली आहे आणि म्हटले आहे की त्याला शिस्तभंगाच्या समस्येमुळे वगळण्यात आले असावे. ‘हसना मन है’ या कार्यक्रमात बोलताना शहजाद म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमारने कुलदीपला धक्का दिला. त्याने गौतम गंभीरवर टीका केली आणि आरोप केला की त्याने संघाच्या वातावरणात राजकारण आणले आहे. गंभीर सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. कुलदीपने आतापर्यंत स्पर्धेत फक्त एकच सामना खेळला आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी बेंचवर राहिल्यानंतर, कुलदीपने कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळला. त्याने त्याच्या तीन ओव्हरमध्ये फक्त 14 धावा देऊन एक विकेट घेतली. तर कुलदीपला नेदरलँड्सविरुद्ध बेंचवर ठेवण्यात आले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला संधी मिळाली नाही.

कुलदीप यादववर अहमद शहजाद : कुलदीप यादवचा सामना जिंकलाणारा खेळाडू

“पाकिस्तानच्या सामन्यानंतर अशी एक घटना घडली जिथे सूर्यकुमार यादवने त्याला धक्का दिला. लोक आता म्हणत आहेत की कदाचित कुलदीप यादवला शिस्तभंगाच्या समस्येमुळे किंवा सूर्यकुमार यादवच्या समस्येमुळे वगळण्यात आले असेल. अन्यथा, त्याला वगळण्यात आले नसते. कुलदीप यादव आपल्या फिरकीमध्ये विविधता आणतो आणि तो एक सामना जिंकणारा खेळाडू आहे,” असेही शहजाद म्हणाला.

Ahmed Shehzad on Gautam Gambhir : गंभीरने राजकारणात प्रवेश केला आणि त्याची मानसिकता स्पष्टपणे बदललीहे

“जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. गंभीरने राजकारणात प्रवेश केला आणि त्याची मानसिकता स्पष्टपणे बदलली. तो राजकारणात फारसा यशस्वी झाला नाही, परंतु असे दिसते की त्याने तेच राजकारण संघाच्या वातावरणात आणले आहे. गौतम गंभीरच्या या सर्व राजकारणामुळे भारतीय संघाची प्रतिमा खराब झाली आहे. संघातील संसाधनांचा योग्य वापर केला जात नाही – गौतम गंभीर त्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत नाही. तुमच्याकडे कुलदीप यादवसारखा सामना जिंकणारा खेळाडू आहे, पण तो योग्यरित्या हाताळला जात नाही,” असे ते पुढे म्हणालाय

आणखी वाचा

Comments are closed.