प्रेमविवाह केला; नंतर दुसऱ्याशी सुत जुळलं, प्रियकरासह पतीला संपवलं, किचन ओट्याखाली पुरलं; बॉयफ्


अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक धक्कादायक (Ahmedabad Crime News) प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून (Ahmedabad Crime News) करून मृतदेह राहत्या घराच्या स्वयंपाकघरात किचनच्या ओट्याखाली पुरल्याचा प्रकार उघड झाला असून, हा खून झाल्यानंतर तब्बल एक वर्ष (Ahmedabad Crime News) उलटलं. ही घटना अहमदाबादमधील रामोल परिसरात घडली आहे. बिहारमधील सिवान जिल्ह्याचा रहिवासी मोहम्‍मद इसराईल अकबरअली अन्सारी याचा विवाह रुबी या महिलेशी २०१५ साली प्रेमविवाहाने झाला होता. विवाहानंतर हे दोघे अहमदाबादमध्ये राहायला आले आणि तेथे अन्सारी मिस्त्री म्हणून काम करत होता. त्यांना दोन मुलेही आहेत.(Ahmedabad Crime News)

Ahmedabad Crime News: स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्याखाली खड्डा खणून मृतदेह पुरला

मात्र, काही काळानंतर रुबीचे इमरान अकबरभाई वाघेला या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जुळले. पती इसराईल हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आणि तो पत्नीवर शारीरिक अत्याचार करीत असल्याच्या कारणावरून रुबी, इमरान आणि आणखी दोघांनी मिळून त्याचा खून केला. अन्सारीचा खून केल्यानंतर आरोपींनी घराच्या स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्याखाली खड्डा खणून मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट आणि फरशा बसवून पुरावे मिटवले. तब्बल एका वर्षानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने इमरान वाघेला याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे पुरला आहे हेही सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी खणून पाहिले असता मानवी हाडे, केस आणि अवशेष आढळले. या प्रकरणी पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, रुबी आणि इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Ahmedabad Crime News: स्वयंपाकघरातील फरशी खोदून काढावी लागली

गेल्या वर्षभरापासून ही महिला आपल्या प्रियकरासोबत त्याच स्वयंपाकघरात स्वयंपाक करुन जेवत होती, जिथे तिने तिच्या पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरला होता. ही भयंकर घटना उघड होताच पोलिसांसह परिसरातील स्थानिकांना मोठा धक्का बसला. पुरलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेला सरखेज येथील एका घराच्या स्वयंपाकघरातील फरशी खोदून काढावी लागली आणि वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाला.

याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत व्यक्ती त्याची पत्नी हे या घरात राहत होते. मोहम्मद इसराईल अकबरअली अन्सारी – उर्फ समीर बिहारी असं या हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. हा गेल्या वर्षभरापासून बेपत्ता होता. गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली की, अन्सारीची हत्या त्याची पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर इम्रान वाघेला यांनी केली आहे. या माहितीवरुन पोलिसांनी प्रियकर वाघेलाला ताब्यात घेतले आणि त्याची कडक चौकशी केली. यावेळी त्याने अन्सारीच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर तो पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे अन्सारीचा मृतदेह पुरण्यात आला होता. ते ठिकाण होतं, घरातील स्वयंपाकघर. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करण्यात आले आणि आत एका मृतदेहाचे अवशेष सापडले अशी माहिती गुन्हे शाखेने एका अधिकृत निवेदनात दिली.

Ahmedabad Crime News: वाघेला आणि रुबी यांच्यात प्रेमसंबंध

मृताची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक आणि डीएनए चाचण्या केल्या जात आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृतक बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गवंडी होता आणि तो गेल्या पाच वर्षांपासून त्याची पत्नी रुबी आणि दोन मुलांसह सरखेज येथील अहमदी रो हाऊसमध्ये राहत होता. तर, वाघेला आणि रुबी यांच्यात प्रेमसंबंध होते. अन्सारीला याबाबत माहिती झाल्यावर तो पत्नीला मारहाण करु लागला, तसेच तो या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे रुबी आणि वाघेला यांनी त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेताल, असंही पोलीस तपासात समोर आलं आहे.

चाकूने गळा चिरुन अन्सारीची हत्या करण्यात आली. त्यानंतर, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरातील ओट्याखाली खड्डा केला आणि त्यात त्याला पुरलं. त्यानंतर सिमेंट आणि टाईल्सने सर्व पुरावे नष्ट केले. गेल्या वर्षभरापासून रुबी आणि वाघेला याच घरात राहत होते. ज्याखाली त्यांनी अन्सारीला पुरलं त्याच ओट्यावर ते स्वयंपाक करायचे, तिथंच राहायचे. या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी प्रियकर वाघेला आणि पत्नी रुबीला अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा, गुन्हे शाखेने या प्रकरणासंदर्भात मोहसीन पठाण (20) आणि रहीम शेख (22) या आणखी दोन आरोपींना अटक केली.

आणखी वाचा

Comments are closed.