एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर; हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

एआय कटडाउन जॉब Amazon मेझॉन: आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तंत्रज्ञानाचे जाळे आता सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणत नवी क्रांति करत आहे. मात्र हेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आता अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आणण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पुढे आले आहे. कारण नुकतेच अॅमेझॉन (Amazon) सीईओ अँडी जॅसी यांनी सांगितले की, कंपनी अधिक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्स आणि एजंट्सचा अवलंब करत असल्याने येत्या काही वर्षांत कंपनीचे कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील, असे संकेत दिले आहे.

तर दुसरीकडे, संगणक कार्यप्रणाली विंडोजच्या निर्मात्या मायक्रोसॉफ्टकडून आगामी जुलै महिन्यामध्ये हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे नियोजन सुरू असल्याचे वृत्त आहे. यामुळे या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी मनुष्यबळ कपात ठरण्याची शक्यता आहे.  एआय (AI) अर्थात कृत्रिम प्रज्ञेमधील वाढती गुंतवणूक आणि खर्च याचा योग्य ताळमेळ राखण्यासाठी कंपनीकडून हे पाऊल उचलेले जात असल्याचे बोललं जात आहे. परिणामी या बड्या कंपनीच्या सीईओंनी आणखी नोकऱ्या काढून टाकण्याचे संकेत दिले असल्याने आणि एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर होण्याची वेळ आली आहे.

सीईओ अँडी जॅसी नेमकं काय म्हणाले?

अॅमेझॉन (Amazon) सीईओ अँडी जॅसी यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनी अधिक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्स आणि एजंट्सचा अवलंब करत असल्याने येत्या काही वर्षांत कंपनीचे कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील. “आजच्या काळात केल्या जाणाऱ्या काही कामांसाठी आपल्याला कमी लोकांची आणि इतर प्रकारच्या कामांसाठी कमी लोकांची आवश्यकता असेल,” असे जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे. “कालांतराने हे नेमके कुठे जाईल हे जाणून घेणे कठीण आहे, परंतु पुढील काही वर्षांत, आम्हाला अपेक्षा आहे की यामुळे आमचे एकूण कॉर्पोरेट कर्मचारी कमी होतील.” असेही ते म्हणाले आहे.

.. तर भविष्यात सध्याच्या मनुष्यबळापेक्षा अतिशय कमी मनुष्यबळ लागेल

तर पुढे बोलताना अँडी जॅसी यांनी सांगितलं की, कंपनी अजूनही त्यांच्या एआय प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि प्रगतीला गती देण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी एआय एजंट्सच्या परिवर्तनीय क्षमतेची नोंद केली. सॉफ्टवेअर सिस्टम जे नैसर्गिक भाषा समजू शकतात आणि संशोधन, ऑटोमेशन, भाषांतर आणि विसंगती शोधणे यासारखी जटिल कामे करू शकतात. सध्या आपल्याला आवश्यक कामकाजासाठी असलेल्या मनुष्यबळापेक्षा अतिशय कमी मनुष्यबळ भविष्यात लागेल. सध्याचे कर्मचारी वेगळ्या प्रकाराचे काम करीत असतील. एआयच्या माध्यमातून आपण कार्यक्षमता वाढविल्यानंतर मनुष्यबळात कपात होईल,’ असे जेसी यांनी संदेशात म्हटले आहे

हे ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.