केडनाथमध्ये एअर ula म्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॅश झाला

पायलटसह सर्वजण सुरक्षित : लँडिंग दरम्यान अपघात

वृत्तसंस्था/ केदारनाथ

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये शनिवारी एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट, एक डॉक्टर आणि एक नर्स असे तीन लोक होते. हे तिघेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. ऋषिकेश एम्समधून एका रुग्णाला घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर केदारनाथला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात असले तरी  अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे. अचूक तपासणीनंतरच संपूर्ण माहिती समोर येईल.

केदारनाथमधील भाविकांच्या आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर’ ही सुविधा जीवनरक्षक ठरत आहे. केंद्र आणि उत्तराखंड सरकारच्या संयुक्त भागीदारीत हेली रुग्णवाहिका सेवा चालवली जात आहे. याचदरम्यान लँडिंग करताना शनिवारी हे अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळले आहे. ऋषिकेश एम्सहून केदारनाथला येणारे हेलिकॉप्टर अचानक नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर लँडिंग दरम्यान कोसळले. केदारनाथ हेलिपॅडपासून 20 मीटर अंतरावर ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी गंगोत्रीला जात असताना गंगानानीजवळ एक हेलिकॉप्टर अपघात झाल्यामुळे 6 जणांना जीव गमवावा लागला होता. या हंगामातील हेलिकॉप्टर अपघाताची ही दुसरी घटना आहे. परंतु सुदैवाने यावेळी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments are closed.