हवाई दलाची 'ग्लाइड बॉम्ब'ची यशस्वी चाचणी

‘खगंतक-243“ची ड्रॉप टेस्ट : भारतीय वायुदलाची मारक क्षमता वाढणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय वायुदलाने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे. देशातच विकसित करण्यात आलेल्या ‘खगंतकर-243“ या लाँग रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी ड्रॉप टेस्ट करण्यात आली आहे. या परीक्षणादरम्यान बॉम्बने निर्धारित लक्ष्य अचूकपणे भेदले आहे. ‘जेएसआर डायनॅमिक्स“ या भारतीय संरक्षण कंपनीने ‘खगंतक-243“ हा ग्लाइड बॉम्ब विकसित केला आहे. हा बॉम्ब लढाऊ विमानातून सोडण्यात आल्यावर थेट खाली न पडता हवेत ग्लाइड करत लक्ष्याच्या दिशेने पुढे जातो. त्यामुळे लढाऊ विमानाला लक्ष्याच्या अत्यंत नजीक जाण्याची गरज भासत नाही. या परीक्षणाने सर्व लक्ष्यांना प्राप्त करत आत्मनिर्भर भारताद्वारे मारक क्षमतेचे नवे आयाम स्थापित केले आहेत असे वायुदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

140 किमीपेक्षा अधिक मारकक्षमता

उपलब्ध माहितीनुसार ‘खगंतक-243“ची 140 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्ष मारक पल्ला हे विमानाने गाठलेली उंची आणि इतर परिस्थितींवर अवलंबून असते.

सुखोई-३० एमकेआय चाचणी

खगंतक-234 या स्वदेशी ग्लाइड बॉम्बची चाचणी सुखोई-30एमकेआय या लढाऊ विमानातून करण्यात आली आहे. मार्गदर्शन प्रणालीमुळे निर्धारित लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता या ग्लाइड बॉम्बने दाखवून दिली आहे. तसेच यामुळे आमची लढाऊ विमाने शत्रूच्या रडारच्या कक्षेत न येता त्याच्यावर हल्ला करू शकणार आहेत.

आत्मनिर्भर भारताला मोठे बळ

भारतीय वायुदलाने या यशस्वी परीक्षणाचे स्वागत करताना ही कामगिरी ‘आत्मनिर्भर भारत“ आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात भारतीय वायुदलाला सुरक्षित अंतरावरूनच अचूक हल्ला करण्याची क्षमता अधिक मजबूत करता येणार आहे.

खगंटक-243

खगंतक-243 एक स्वदेशी लाँग-रेंज-स्टँड-ऑफ प्रिसिजन स्ट्राइक शस्त्रास्त्र आहे. ग्लाइड बॉम्बला विमानातून सोडण्यात आल्यावर ते पारंपरिक बॉम्बप्रमाणे थेट खाली कोसळण्याऐवजी ग्लाइड करत लक्ष्याच्या दिशेने पुढे जाते. यामुळे लढाऊ विमानाला लक्ष्याच्या नजीक न जाता हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होते.

खगंतक-243 ची वैशिष्ट्यो…

स्वदेशी डिझाइन : खगंतक-243 ला पूर्णपणे भारतातच डिझाइन आणि विकसित करण्यात आले आहे. जेएसआर डायनॅमिक्सने हा ग्लाइड बॉम्ब विकसित केला असून यामुळे स्वदेशी अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली.

दीर्घ पल्ल्यापर्यंत हल्ला करण्याची क्षमता : खगंतक-243 एक लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब आहे. खगंतक-243 ला लढाऊ विमानातून दीर्घ अंतरावरून डागले जाऊ शकते. यामुळे विमानाला लक्ष्याच्या अत्यंत नजीक जाण्याची गरज भासत नाही.

ग्लाइड करत पोहोचतो लक्ष्यापर्यंत : हा सामान्य बॉम्बप्रमाणे थेट खाली कोसळत नाही. विमानातून सोडण्यात आल्यावर याचे पंख खुले होतात आणि हा हवेत ग्लाइड करत लक्ष्याच्या दिशेने पुढे जात असतो.

अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम : खगंतक-243 ला अचूक हल्ल्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यात बसविण्यात आलेली मार्गदर्शन प्रणाली या ग्लाइड बॉम्बला निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते.

Comments are closed.