किराणा टेकडीबाबत हवाई दलाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पाकिस्तानची अण्वस्त्रे असणाऱ्या किराणा टेकड्यांवर भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या काळात हल्ला केला होता की नाही, यासंदर्भात भारताच्या वायुदलाने स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंत या संदर्भात अनेक उलट सुलट प्रतिपादने करण्यात आली आहेत. या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भारतीय वायुदलाने केला आहे. या टेकड्यांवर वायुदलाने हल्ला केला नव्हता, अशी स्पष्टोक्ती वायुदलाचे उपप्रमुख नागेश कपूर यांनी गुरुवारी बोलताना केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांना या हल्ल्यासंबंधात थेट प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर त्यांनी ‘नाही’ अशा शब्दात दिले.

आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी अ•dयांवर निश्चित हल्ला केला होता. अनेक दहशतवादी अ•s आम्ही नष्ट केले आहेत. तसेच पाकिस्तानच्या अनेक सैनिकी स्थानांवर आम्ही अचूक हल्ले केले आणि ती स्थाने नष्ट केली. आमचा हल्ला आधी ठरल्यानुसार करण्यात आला होता. मात्र, या योजनेत किराणा टेकड्यांना कोणतेही स्थान नव्हते. त्यामुळे या टेकड्यांवरही भारताने हल्ला केला होता, या प्रतिपादनात काही अर्थ नाही. या टेकड्यांवर हल्ला करण्याची आमची मुळात योजनाच नव्हती. त्यामुळे अशा हल्ल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Comments are closed.