अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 40 मृतांची ओळख संशयास्पद, 52 ब्रिटिश नागरिकांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला संताप

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा काही क्षणातच कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातातील 40 मृतांची ओळख संशयास्पद असल्याचा दावा युकेतील कायदेशीर फर्म स्टोन लॉने केला आहे. हिंदुस्थानातून पाठवण्यात आलेल्या 12 मृतदेहांपैकी दोघांची ओळख चुकीची आढळली असून या दोघांचे कुटुंबिय आता डीएनए अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. या हलगर्जीपणाबद्दल 52 ब्रिटीश नागरिकांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक मृतदेहांवर आधीच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हिंदुस्थानातील तपाससंस्थेला एएआयबी अर्थात एअरक्राफ्ट ऑक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे कॉकपिट रेकॉर्डिंग आणि इंथन कटऑफसारखे महत्वाचे पुरावे पुटुंबियांना देण्याची विनंती ब्रिटीश वकील जेम्स हीली प्रॅट यांनी केली आहे. हिंदुस्थान, इंग्लंड तसेच अमेरिकेत याप्रकरणी कायदेशीओर कारवाईला वेळ लागत असल्याने टाटा समूहाकडून देण्यात येणाऱया 500 कोटी रुपयांच्या भरपाई योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे तसेच पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही ब्रिटीश नागरिकांच्या कुटुंबियांनी केली .

Comments are closed.