मुंबई-न्यूयॉर्क विमान अर्ध्या वाटेवरून परत

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे एआय 119 हे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे हे विमान अर्ध्या वाटेवरून परत बोलावण्यात आले. विमान पुन्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. विमानाच्या शौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी सापडली होती. 19 क्रू मेंबर्ससह एकूण 322 प्रवासी या विमानात होते. 11 मार्चला आता विमान उड्डाण करेल.
Comments are closed.