मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंगवेळी टायर फुटले

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका हवाई वाहतूकीला देखील बसला आहे. सोमवारी मुंबई विमानतळावर लँड करणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे तीन टायर फुटल्याचे समजते. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगवधान दाखवत विमानाला सुरक्षितरित्या लँड केले. या घटनेत विमानातील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
21 जुलै 2025 रोजी कोची ते मुंबई पर्यंत कार्यरत फ्लाइट एआय 2744, लँडिंग दरम्यान मुसळधार पाऊस पडला, परिणामी टचडाउननंतर धावपट्टीचा प्रवास झाला. गेटवर सुरक्षितपणे टॅक्स केलेले हे विमान आणि त्यानंतर सर्व प्रवासी आणि चालक दल सदस्य खाली उतरले आहेत. विमान झाले आहे…
– वर्षे (@अनी) 21 जुलै, 2025
एअर इंडियाचे AI 2744 हे विमान कोचीवरून मुंबईला येत होते. हे विमान मुंबई विमानतळावर लँड होत असताना मुसळधार पाऊस सुरू होता. खराब हवामानामुळे लँडिंग करताना विमानाची चाकं जशी जमिनीला लागली तसा विमानात टर्ब्युलन्स झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने वैमानिकाने व्यवस्थित लँड केल्याने मोठा अनर्थ टळला.
Comments are closed.