एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे हवाई दलाचे नवे प्रमुख होणार आहेत.
अमरप्रीत सिंह यांचे स्थान घेणार : 3500 तासांचा उड्डाण अनुभव
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांना भारतीय वायुदलाचा 29 वा प्रमुख नियुक्त केले आहे. 31 ऑक्टोबरपासून दीक्षित हे एअर चीफ मार्शलचा पदभार सांभाळणार आहेत. वर्तमान चीफ ऑफ एअर स्टाफर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह त्याचदिवशी सेवानिवृत्त होणार आहेत. ही नियुक्ती वायुदलाच्या नेतृत्वात बदलाचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे सध्या व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ पदावर आहेत. यापूर्वी ते चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ राहिले आहेत.
एनडीए, बांगलादेशचे डिफेन्स स्टाफ सर्व्हिस कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे मिराज-2000, मिगची विविध विमाने, किरण, जग्वार, आयएल-78, हॉक आणि तेजससमवेत अनेक विमानांवर 3500 हून अधिक तासांचा उ•ाणाचा अनुभव आहे. एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट आणि क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर देखील आहेत.
जवळपास 4 दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन सिंदूर यासारख्या अनेक अभियाने आणि अभ्यासांमध्ये सक्रीय भूमिका बजावली आहे. पश्चिम क्षेत्रात एक फ्रंटलाइन फायटर एअरबेस आणि दक्षिण क्षेत्रात प्रमुख फायटर ट्रेनिंग बेसची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
विविध पदांवर राहत त्यांनी वायुदलाची संचालन क्षमता वाढविण्यात योगदान दिले. उत्कृष्ट सेवेसाठी 2006 मध्ये वायुदल पदक, 2011 मध्ये विशिष्ट सेवा पदक, 2023 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि 2026 मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने आशुतोष दीक्षित यांना गौरविण्यात आले आहे.
Comments are closed.