मुंबईकरांचा श्वास कोंडला, होळीनंतर धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब

होळीनंतर धुळवडीच्या दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली असून अंधेरी आणि देवनार येथील हवा सर्वाधिक वाईट असल्याचे निरीक्षण ‘सफर’ या  हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या हवामान विभागातील संस्थेने नोंदवले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांचा श्वास अक्षरशः कोंडला. ठिकठिकाणी करण्यात आलेले होलिकादहन आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या रंगांमुळे प्रदूषण वाढल्याचे आढळले. हे लक्षात घेऊन मुंबईकरांनी मास्क वापरावे तसेच वाहतूककोडी टाळावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

आज सकाळी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 125 वर पोहोचला, तर अंधेरी आणि देवनार येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 293 आणि 200 इतका नोंदवला गेला.

Comments are closed.