केबिन क्रूच्या विश्रांती नियमांवरून गोंधळ, डीजीसीएच्या नव्या प्रस्तावाला विमान कंपन्यांचा विरोध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ऑक्टोबर 2025मध्ये केबिन क्रू यांच्या विश्रांतीबाबत प्रस्तावित केलेल्या नवीन नियमांना एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यानी विरोध दर्शविला आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स’ (एफआयए) द्वारे या कंपन्यानी असा दावा केला आहे की, हे नियम जागतिक मानकांपेक्षा अधिक कडक असून यामुळे विमान वाहतुकीच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात.

विमान कंपन्याच्या मते, कर्मचाऱयांचा थकवा दूर करण्यासाठी केवळ ‘फ्लाईट टाईम’ (विमानाचा हवेतील वेळ) विचारात न घेता ‘फ्लाईट डय़ुटी पिरियड’ (कामावर हजर झाल्यापासून ते सुट्टी होईपर्यंतचा एपूण वेळ) हा मुख्य निकष असावा. 12 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात FIedA ने म्हटले आहे की, प्रस्तावित नियम जागतिक मानकांच्या तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक आहेत, ज्यामुळे कामकाजात लवचिकता राहत नाही.

विश्रांतीचा थेट संबंध विमानांच्या लँडिंगशी न जोडता तो एकूण कामाच्या तासांशी जोडला जावा. तसेच कर्मचाऱयांच्या राहण्याच्या जागेपेक्षा विश्रांतीच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. तसेच द्विन-शेअरिंग (एकाच रूममध्ये दोन कर्मचारी) व्यवस्थेला कंपन्यानी समर्थन दिले आहे. नियम हे पुराव्यावर आधारित आणि व्यावहारिक असावेत, जेणेकरून जागतिक विमान वाहतूक मानकांशी सुसंगत राहता येईल, या विमान कंपन्याच्या प्रमुख मागण्या आहेत.

Comments are closed.